मुंबई : सध्या शिवसेनेत सुरु असलेली आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची गळती थांबायचं नाव घेत नाहीये. मात्र आता शिवसेनेसाठी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या आणि प्रसिद्ध वक्त्या प्रा. सुषमा अंधारे यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. सुषमा अंधारे यांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज गुरुवारी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी त्यांच्या हातावर शिवबंधन बांधलं. उद्धव ठाकरे यांनी अंधारेंवर उपनेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यानंतर त्यांनी स्वतःच मनोगत व्यक्त केलं.
सुषमा अंधारे म्हणाल्या कि, “माझ्या डोक्यावर ईडीच्या फाईलींचं ओझं नाही किंवा भविष्यातील अमिषांचं प्रलोभनही नाही. त्यामुळेच आज गळे काढून रडायचं आणि उद्या दुसऱ्या गटात सामील व्हायचं असं काहीही माझ्याबाबतीत घडणार नाही. तसेच अनेक लोक बोलतायेत की, तुम्ही आधी शिवसेनेवर टीका केली होती. त्यावरच एवढच बोलते की, कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू परवडतात. त्यामुळे आम्ही कधीकाळी दिलदारपणे शिवसेनेवर टीकाही केली. पण आज आमच्या सगळ्यांचा एकच संविधानिक शत्रू असेल तर त्याच्याशी लढण्यासाठी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आम्हाला मान्य असेल.”
पुढे बोलताना त्या असेही म्हणाल्या कि, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची लेक म्हणून मला जे प्रेम आणि जो लौकिक मिळाला आहे. तसंच प्रेम शिवसैनिकांकडून मिळावं. मी महाराष्ट्रातील शिवसैनिकाच्या घरातील बहीण आणि लेक होण्याचा प्रयत्न करेल, कारण ती जागा कोणत्याही पदापेक्षा मोठी आहे.” दरम्यान सुषमा अंधारे यांच्यासोबत आणखी काही महिला कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर अंधारेंच्या प्रवेशामुळे शिवसेनेचं बळ आता आणखी वाढणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena MP | शिवसेना खासदारांची लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव! शिंदेंना घेरण्याची तयारी
- Mamata Banerjee | पार्थ चॅटर्जींना मंत्रिपदावरून हटवले; ईडीच्या कारवाईनंतर ममता बॅनर्जींनी घेतला निर्णय
- Shivsena: सुषमा अंधारेंची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली ‘ही’ अपेक्षा
- Obc Reservation | 365 ठिकाणी OBC आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर भुजबळांची प्रतिक्रिया
- Sushma Andhare : सुषमा अंधारे यांचा शिवसेनेत प्रवेश, मिळाली उपनेतेपदाची जबाबदारी
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<