Sushma Andhare | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आजकाल प्रचंड आक्रमक असतात. अशातच त्यांनी भाजप (BJP) नेते नारायण राणे (Narayan Rane) आणि किरीट सोमय्या (Kirit Somaiyaa) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच किरीट सोमय्या हे ईडीचे कंत्राटी कामगार असल्याची टीका देखील अंधारेंनी केली आहे.
नारायण राणे हे जनतेच्या टॅक्सच्या पैशावर मजा मारणारे कुटुंब आहे, असा खोचक टोला सुषमा अंधारोंनी लगावला आहे. आपण कणकवलीत राणेंच्या विरुद्ध शब्दांना आवर घातला नाही. जे लोक घाबरट असतात त्यांना गुंडशक्तीचा आधार घ्यावा लागतो. त्यांच्या विरुद्ध आम्ही रणरागिणीच काफी आहोत, असं देखील सुषमा अंधारे म्हणाले.
यादरम्यान, सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्यांवर देखील घणाघात केला याहे. किरीट सोमय्या हे कंत्राटी कामगार आहेत का, ईडीने त्यांना ईडीने कंत्राटी कामगार म्हणून नेमले आहे का, अशा शब्दात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी किरीट सोमय्या यांना डिवचलं. तसेच नारायण राणे खतम, असे म्हणणाऱ्या किरीट सोमय्यांना राणेंना मंत्री पद मिळाल्यानंतर मुंबईत राणेंना पायघड्या टाकणारे तेच किरीट सोमय्या आहेत, असं अंधारे म्हणाल्या.
दरम्यान, भाजपने किरीट सोमय्यांना समजून घ्यावं, भाजपन मंत्री पद देऊन त्यांचे पुनर्वसन केलं पाहिजे, असे सांगतानाच अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही हे चुकलेलं आहे, असं म्हणत सुषमा अंधारेंनी देवेंद्र फडणवीसांवर देखील टीका केली.
महत्वाच्या बातम्या :
- Thackeray vs Shinde | ठाकरे गटाचे 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात येतील ; शिंदे गटातील खासदाराचा दावा
- IND vs NZ | टीम इंडियाकडून तिसऱ्या क्रमांकावर कोण करेल फलंदाजी?, विराट की सूर्यकुमार
- Nitesh Rane | “राहुल गांधींबरोबर ‘भारत जोडो’ यात्रेत चालण्यासाठी पैसे देऊन कलाकार आणलेत”; नितेश राणेंचे गंभीर आरोप
- PM Narendra Modi | दाऊदच्या गुंडांनी रचला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येचा कट? मुंबई पोलिसांना धमकीचा मेसेज
- IND vs NZ | भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात पावसामुळे येणार व्यत्यय?, जाणून घ्या हवामान अंदाज