Share

Sushma Andhare | “राज्यपाल पदमुक्त होऊ इच्छितात ही भाजपची स्क्रीप्ट”, सुषमा अंधारे आक्रमक

Sushma Andhare | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांना पदावरुन तातडीने हटवण्याची मागणी होत आहे. अशातच राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यावेळी त्यांना स्वतःलाच पद नको असल्याचं त्यांनी म्हटलं असल्याचं समोर आलं. यावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजप (BJP) पक्षावर हल्लाबोल केला आहे.

यावेळी, सरकार त्यांचं आहे. त्यामुळे काहीही होऊ शकतं. संजय राऊत यांचं स्पिरीट आम्हाला माहीत आहे. समन्स, नोटिसा, कारवाई किंवा तुरुंगवास असला, तरी राऊत यांचं स्पिरीट कशानंही झुकणार नाही. थांबणार नाही. ते लढत राहणार आहेत. त्यांच्याविरोधात प्रचंड कट रचले जात आहेत. संजय राऊत कशात अडकू शकतात. यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

आम्ही या सर्व गोष्टींसाठी तयार आहोत. समोर अटकेची तलवार माहिती आहे. कारवाया काय होऊ शकतात. काय खोट्यानाट्या केसेस दाखल केल्या जाऊ शकतात. सगळ्या कल्पना आहे. तरीही आम्ही लढणार आहोत, असा घणाघात अंधारेंनी केला आहे.

राज्यपालांना पायउतार होण्याची नामुष्की टाळण्यासाठी राज्यपाल पदमुक्त होऊ इच्छितात, अशी एक नवी स्क्रीप्ट भाजपकडून रचली जात आहे. पण, ती स्क्रीप्ट महाराष्ट्राच्या पचनी पडणारी नाही, असं देखील त्या म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या :

Sushma Andhare | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांना पदावरुन तातडीने हटवण्याची मागणी होत …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now