Sushma Andhare | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मनसे (MNS) पक्षाच्या राज ठाकरे (Raj Thackeray) टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. मनसेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षांनी अंधारेंच्या सभेत राडा करण्याची धमकी दिली होती. तर यावर अपना एक स्टाईल हैं, इलाका तुम्हारा और धमाका हमारा, असं म्हणत त्यांनी मनसेला खुलं आव्हान दिलं.
मनसेच्या टीकेवर मी केवळ हसू शकते. ‘अपना एक स्टाईल हैं, इलाका तुम्हारा और धमाका हमारा’. मी पाठीमागे अजिबात बोलत नाही. मी जे बोलते ते अत्यंत वस्तुस्थिती आणि सत्य ते बोलत आहे. आजारपणाची टिंगल करणं हे कुठल्याही सुसंस्कृत, सभ्य, संवेदनशील माणसाला रुचणारं नाही, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
असं असलं तरी मी मुलुंडच्या सभेत मांडलेले मुद्दे गैरलागू आहेत असं कोणाला वाटत असेल, तर माझी चर्चा करण्याची तयारी आहे. त्यांनी खुल्या सभेत चर्चेला उभं राहावं आणि ते जे बोलले ते मांडणं किती महाराष्ट्राच्या हिताचं होतं हे सांगावं. माझी त्यावर बोलण्याची तयारी आहे. ते मला त्यांचा मुद्दा पटवून देऊ शकले तर मी त्यांच्या शिष्यत्वाचा गंडा बांधायला तयार आहे, असं देखील त्या म्हणाल्या.
असं असलं तरी ते मुद्द्यांची भाषा गुद्द्यांवर नेणार असतील तर शिवसेनेला गुद्द्यांची भाषा कुणीही शिकवण्याची गरज नाही. राडा संस्कृतीचा एनसायक्लोपिडिया शिवसेनेने लिहिला आहे, असं सुद्धा सुषमा अंधारे म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या :
- Nilesh Rane | “शरद पवारांनी पोलिसांकडून मार खाल्लेला पुरावा…”; सीमावादावरून निलेश राणेंची सडकून टीका
- Aditya Thackeray | सीमावादावरुन आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, म्हणाले…
- Dhananjay Munde | “मराठी माणसाच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा आम्हाला…”, धनंजय मुंडेंचं विधान
- Sambhajiraje Bhosale | “… नाहीतर मला कर्नाटकात यावे लागेल”, संभाजीराजे भोसले यांचा इशारा
- Shambhuraj Desai | “उद्धव ठाकरे अडीच वर्ष कुणापुढे झुकले…”; शंभूराज देसाईंची बोचरी टीका