Share

Sushma Andhare | ‘पुणे बंद बेकायदेशीर’ म्हणणाऱ्या सदावर्तेंना सुषमा अंधारेंचं सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाल्या…

Sushma Andhare | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsinh Koshyari) आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय पक्ष आणि विविध संघटनांनी पुणे बंदची हाक दिली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), संभाजी ब्रिगेड आणि इतर काही संघटना बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या.

यात भाजपचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) देखील सहभागी झाले होते. पण हा बंद बेकायदेशीर असल्याचा आरोप करत वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratn Sadavarte) यांनी उदयनराजे भोसले यांच्या अटकेची मागणी केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी चांगलंच सुनावलं आहे.

त्या म्हणाल्या, ”संतुलन बिघडलेल्या लोकांबद्दल बोलण्यात अर्थ नाही. त्या माणसाला नवणीत राणा मातोश्रीवर घुसण्याच्या प्रयत्न करतात, ते कायदेशीर वाटतं, एसटी कामगार ‘सिल्वर ओक’वर घुसण्याचा प्रयत्न करतात, ते कायदेशीर वाटतं. मात्र, आम्ही सनदशीर मार्गाने आमचा निषेध नोंदवत असताना ते बेकायदेशीर वाटतं. यावरून सदावर्तेंचा आणि कायद्याचा किती संबंध असेल, हे लक्षात येईल. ईश्वर त्यांना क्षमा करो.”

काय म्हणाले होते सदावर्ते?

ते म्हणालेत, “सर्वोच्च न्यायलयाने अनेकदा सांगितलं आहे की बंद बेकायदेशीर आहेत, असं असताना आज हा बंद पुकारण्यात आलाय. कष्टकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचं काम सुरू आहे. हा बंद बेकायदेशीर आहे. त्यामुळे उदयनराजेंना अटक करण्यात यावी.”

महत्वाच्या बातम्या :

Sushma Andhare | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsinh Koshyari) आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांच्या वादग्रस्त …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now