Share

Sushma Andhare । मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार का?; सुषमा अंधारे म्हणाल्या…

Sushma Andhare । पुणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सर्वात जवळचे मानले जाणारे मिलिंद नार्वेकर पक्षात नाराज असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहेत. अशातच मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामुळे राजकीय चर्चांना मोठ्या प्रमाणात उधाण आलं आहे. एवढंच नाही तर याबाबत भाजप (BJP) गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

मिलिंद नार्वेकर ठाकरे गटात नाराज असल्याचं मी सुद्धा ऐकतो आहे, असं विधान भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. मात्र या चर्चा म्हणजे भाजपचा फुसका बार असल्याचं शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलंय. सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मीडियाशी संवाद साधताना या चर्चांबाबत भाष्य केलं आहे.

त्या म्हणाल्या, दिवाळी असल्याने काही लवंगी मिरच्या तडतड करत आहेत. काही छोट्या छोट्या फुलबाज्या सुध्दा आपली चमक दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काही फुसके बार देखील होत आहेत. मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार हा तोच फुसका बार आहे. जो भाजपने सोडला आहे, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

भाजपकडून मिलिंद नार्वेकर यांच्या नावाने सातत्याने फुसका बार सोडला जात आहे. पण भाजपचा हा फुसका बार काही केल्या वाजत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी त्यांनी केंद्रीय नारायण राणे यांच्यावरही टीका केली. राणे पिता पुत्रांबद्दल मला फार गांभीर्याने काहीच मांडावं असं वाटत नाही. राणे यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्यांना मैदानात येता येणार नाही. त्यांना पव्हेलियनमध्येच बसून राहावे लागेल, असं म्हणत त्यांनी राणेंना चिमटा काढलाय. कोण ठाकरे? असं विचारता पण त्याच ठाकरेंनी तुमची कुवत नसताना सुद्धा तुम्हाला एवढ्या मोठा पदावर बसवलं. याच ठाकरेंमुळे आणि याच मातोश्रीमुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचला. नाहीतर ठाकरे नसते तर नारायण राणे कणकवली लिमिटेड कंपनी इतकचं मर्यादित असते, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

महत्वाच्या बातम्या :

Sushma Andhare । पुणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सर्वात जवळचे मानले जाणारे मिलिंद …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics Pune