Share

Sushma Andhare | “अण्णा हजारेंमुळेच…” ; सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप, काय आहे प्रकरण?

Sushma Andhare | जळगाव : शिवसेनेच्या फायरब्रॅन्ड नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) महाप्रबोधन यात्रेनिमित्त जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ‘जनलोकपाल’ आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच सरकार उलथवून टाकण्यासाठीच अण्णा हजारेंनी जनलोकपाल आंदोलन केलं, असा गंभीर आरोप केला आहे.

“तेव्हा आंदोलन करणारे अण्णा हजारे (Anna Hajare) आज मात्र एवढे प्रश्न समोर असतानाही गप्प आहे. त्यावर चकार शब्द बोलत नाहीत,” असं म्हणत सुषमा अंधारेंनी अण्णा हजारेंवर निशाणा साधला. पुढे त्या म्हणाल्या, “अण्णा हजारेंमुळेच भाजपा सत्तेत आली. त्याबाबत मी शास्त्रशुद्ध मांडणी केलीय. अण्णा हजारे (Anna Hajare) लोकपालाची जी मांडणी करतात ती मागणीच मुळात संवैधानिक चौकटीच्या बाहेरची असल्याचं त्या म्हणाल्या.

आपल्याकडील संसदीय लोकशाही मोडीत काढून अध्यक्षीय लोकशाही आणण्याचाच तो एक प्रयत्न असल्याचं सांगत त्यातील त्रुटी कधीच दाखवण्याचा प्रयत्न झाला नसल्याचं सुषमा अंधारे यांनी यावेळी स्पष्ट केलं. “संवैधानिक चौकटीत सत्ता विकेंद्रिकरण आणि अहस्तक्षेपाचे तत्व या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. लोकपाल आंदोलन सत्तेच्या विकेंद्रीकरणाऐवजी सत्तेच्या केंद्रीकरणावर आणि एकहाती सत्ता देण्यावर भर देणारं होतं. अर्थात चौकटीच्या बाहेरचं होतं,” असाही आरोप सुषमा अंधारेंनी केला आहे.

त्याबरोबरच “कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे तिघे विभक्त असले पाहिजे ही मूळ चौकट आहे. जेव्हा या तिघांच्या वर लोकपाल बसवला जातो तेव्हा संवैधानिक चौकट मोडण्याचाच प्रयत्न होतो. माणसात निवडकपणा किती असतो, तेच अण्णा हजारे आज एवढे प्रश्न उभे राहत आहेत, पेच निर्माण होत आहेत, पण त्यावर ते चकार शब्द बोलत नाहीत,” असं म्हणत सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी अण्णा हजारे यांच्यावर टीका केलीय.

महत्वाच्या बातम्या :

Sushma Andhare | जळगाव : शिवसेनेच्या फायरब्रॅन्ड नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) महाप्रबोधन यात्रेनिमित्त जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now