Share

Sushma Andhare | सुषमा अंधारे यांचा गुलाबराव पाटलांना इशारा, म्हणाल्या…

Sushma Andhare | जळगाव : सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दिवसेंदिवस एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट यांच्यातील वाद वाढतच चालले आहेत. दोन्ही गटातील नेत्यांमधील  आरोप-प्रत्यारोपाची खेळी रंगत चालली आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर हल्ला केला आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे (Sushma Andhare)

मी तुम्हाला सळो की पळो करून सोडणार, आज तुम्हाला झोप येणार नाही, असा इशारा सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील यांना दिला आहे. सुषमा अंधारे यांनी काल धरणगाव येथे प्रबोधन सभा घेतली. त्यांनी त्यावेळी शिंदे गटातील नेत्यांवर टीकेबाजी केली असल्याचं समजतं आहे.

आमचे नेतृत्व हे संयमी व शिस्तबद्ध आहे. आमचे 40 भाऊ तिकडे गेले आहे, त्यातील एक शेरो शायरी करणारे भाऊ गुलाबराव पाटील. एकाच घरात किती दिवस सत्ता ठेवायची असे गुलाबराव पाटील म्हणतात. मात्र, ते कधीपासून पद भोगत आहेत. याचा पाढाच सुषमा अंधारे यांनी वाचला. गुलाबराव पाटील यांनी स्वतःचा चेहरा आरशात पाहावा. तुम्ही 20 वर्ष वेगवेगळ्या मार्गाने सत्ता भोगत आहात. मग इतर कार्यकर्त्यांना तुम्ही पुढे करून त्यांना सत्तेवर का आणलं नाही?, असा सवाल अंधारे यांनी केला आहे.

पुढे बोलताना अंधारे म्हणाल्या की, दसऱ्या मेळाव्यात वक्तव्य करणाऱ्या गुलाबराव पाटील यांनी झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवायची होती. युपी, बिहारमधून लोकांना सभेसाठी बोलवलं. लोकशाही व इतर प्रसार माध्यमांवर याबाबत बातम्या आल्या आहेत. निधी बाबत यांनी बोलायची का हिंमत केली नाही? तेव्हा का दातखिळी बसली? असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. तुम्ही जर हिंदुत्वासाठी तिकडे गेला असाल तर मग 40 लोकांनी हिंदुत्वासाठी जीव पणाला लावायला पाहिजे. यापूर्वी राणे गेले, भुजबळ गेले. मात्र, ते त्यांच्या जीवावर गेले याचा विचार गुलाबराव पाटलांनी करायला हवा होता. ज्या ताटात खाल्लं त्याच ताटात घान करण्याची वृत्ती आहे.

महत्वाच्या बातम्या :

Sushma Andhare | जळगाव : सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दिवसेंदिवस एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आणि उद्धव …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now