Share

Sushma Andhare | “चिमणराव, म्हातारपणात तुम्ही गद्दारीचा डाग का लावून घेतला?”

Sushma Andhare | जळगाव : जेव्हापासून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदारांना सोबत घेऊन राज्यात सरकार स्थापन केलं आहे. तेव्हापासून राज्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट विरूद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट असं चित्र दिसून येतं आहे. दोन्ही गटातील नेते सतत एकमेकांवर टीका, टिपण्णी करत असतात. अशातच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शिंदे गटातील आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांच्यावर हल्ला केला आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे (Sushma Andhare)

चिमणराव, म्हातारपणात तुम्ही गद्दारीचा डाग का लावून घेतला?, असा खोचक सवाल करत सुषमा अंधारे यांनी चिमणराव पाटील यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे यांची एरंडोल येथे  जाहीर सभा होती. त्यावेळी त्यांनी शिंदे गटातील नेत्यांवर टीकास्त्र सोडलं. चिमणराव पाटील मला माझ्या आजोबासारखे आहेत. मात्र, गुवाहाटीत चिमणराव पाटील यांचं चिरतारुण्य दिसलं, असल्याचंही अंधारे यांनी म्हटलं.

उद्धव ठाकरे आजारी असताना एकनाथ शिंदेंनी भाजपला 40 जणांची कुंडली पुरवली. पण आमदार चिमणराव पाटील यांना का पळपुटेपणा करावा लागला? असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे. पुढे बोलताना त्या असंही म्हाणाल्या की, चिमणराव पाटील तुम्हाला लोक म्हणतील कसं काय पाटील बरं आहे का? गुवाहाटीला गेले ते खरं आहे का?,असा सवाल करत सुषमा अंधारेंनी पाटलांना चिमटाही काढला आहे.

तसेच, अंधारेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केलीय. एकनाथ शिंदे यांच्या बाबत मला काहीही तक्रार नाही. कारण सरकारमध्ये त्यांचं काहीच चालत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा भारी आहेत. ते घटनास्थळी पोहाचण्याआधीच त्यांचा कॅमेरामन पोहोचतो. मुख्यमंत्री निवडला की मॉडेल निवडले?, असा खोचक सवालही केला आहे.
महत्वाच्या बातम्या :

Sushma Andhare | जळगाव : जेव्हापासून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदारांना सोबत घेऊन राज्यात सरकार स्थापन केलं आहे. तेव्हापासून …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now