Share

Sushama Andhare | “देवेंद्र फडणवीस सत्ता प्रेमाने…”, सुषमा अंधारे यांचा उपमुख्यमंत्र्यांवर घणाघात

Sushama Andhare | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) सध्या प्रचंड आक्रमक झाल्या आहेत. अवघ्या कमी वेळात त्यांनी राजकारणात त्यांची एक चांगली ओळख कमवली आहे. अशातच सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर घणाघात केला आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शिंदे गट, प्रहार पक्ष हे सगळं भाजपला संपवायचं आहे, लोक आमदार रवी राणांची माफी लक्षात ठेवणार नाहीत. लोक आमदार बच्चू कडूंवर झालेले आरोप लक्षात ठेवतील. त्यांना विरोधी पक्षच संपवायचे असतील तर स्वातंत्र्य लढ्याला काय अर्थ आहे?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.

यादरम्यान, देवेंद्रभाऊ तुम्ही गृहमंत्री म्हणून कुचकामी ठरत आहात. सत्ता प्रेमाने तुम्ही धृतराष्ट्र झालेले आहात, असा घणाघात देखील अंधारे यांनी केला आहे. तसेच, माझ्याकडे काहीच नाहीये त्यामुळे मला ईडीची भीती नाहीय. एक लेकरू आहे ते शिवसेनेला दान केलंय. मुख्यमंत्री जर तीन महिन्यात माझ्या मागे हात धुवून लागले असतील, तर लक्षात ठेवा. बाजी पलटने वाली है, असा इशारा देखील अंधारे यांनी दिला आहे.

दरम्यान, खबऱ्यांनो, मी एकटी फिरते. मला वाय प्लस सुरक्षा लागत नाही. ज्यांना लोकांची भीती वाटते ते सुरक्षा घेऊन फिरतात. आमच्या नेत्यांची सुरक्षा काढणं हे कुटील डाव कळतात देवेंद्रभाऊ.. आम्ही लढणार आहोत. लढताना आमच्या सुसंस्कृत, संयमी नेतृत्त्वाला शोभेल असं लढू. विश्वास बाळगू की वो आझादी की सुबह आने वाली है, असं अंधारे म्हणाल्याय

महत्वाच्या बातम्या :

Sushama Andhare | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) सध्या प्रचंड आक्रमक झाल्या आहेत. …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now