Sushma Andhare | सुषमा अंधारेंचा अमृता फडणवीसांवर निशाणा; तर मोहित कंबोजांना प्रत्युत्तर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sushma Andhare | मुंबई : दोन दिवसांपूर्वी भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare ) यांच्यावर टीका केली होती. सुषमा अंधारे आणि अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) या दोघी बहिणी आहेत. एक बहिण महाराष्ट्राच्या राजकारणात तर दुसरी बहिण महाराष्ट्राच्या सिनेमात, अशी खोचक टीका करत मोहित कंबोज यांनी अंधारेंवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता सुषमा अंधारेंनी भाजपला चिमटा काढत प्रत्युत्तर दिलं आहे.

प्रत्युत्तर देताना सुषमा अंधारेंनी थेट अमृता फडणवीसांवर (Amruta Fadnavis) निशाणा साधला. त्यांनी राखी सावंतची तुलना थेट अमृता फडणवीसांसोबत केली आहे. सुषमा अंधारे कंबोज यांच्यावर टीका करताना म्हणाल्या की, “बाईपणावर हल्ला करणं हा कटाचा आणि षडयंत्राचा भाग आहे. मी त्याला भीक घालणार नाही. बाईपणाचे कोणतंही विक्टीम कार्ड खेळणार नसून मी लढणार आणि जिंकणारही.”

दरम्यान, “कंबोजची प्रवृत्ती चांगली नाहीये. जर त्याची प्रवृत्ती चांगली असती तर त्याने राखी सावंतची तुलना अजून कोणशीतरी केली असती. पण, राखी सावंतची तुलना ही फक्त अमृता फडणवीसांबरोबर होईल. कारण, राखीच्या चेहऱ्याची सर्जरी झाली आहे आणि अमृता वहिनींच्या सुद्धा चेहऱ्याची सर्जरी झालीये. तसंच राखी गायक आहे तर अमृता वहिनीही गायक आहेत. राखी मॉडेल आहे तर अमृता वहिनीसुद्धा मॉडेल आहेत” अशी मिश्लिक टिपण्णी सुषमा अंधारेंनी केली आहे. याच्या या टिकेने आता राजकीय वर्तुळात अमृता फडणवीस यांना ओढलं असल्याचं पहायला मिळत आहे. तसाच त्यांनी भाजपला देखील चिमटा काढला आहे.

महत्वाच्या बातम्या –