काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकरणीतून सुशिलकुमार शिंदेंचा पत्ता कट

sushilkumar shinde

सोलापूर : दीर्घ प्रतीक्षेनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या सर्वोच्च काँग्रेस कार्यसमिती ची घोषणा केली असून यात २३ ज्येष्ठ नेत्यांना सहभागी करुन घेण्यात आले आहे. मात्र माजी केंद्रीय गृहमंत्री व सोलापूरचे सुपुत्र सुशिलकुमार शिंदे यांना या कार्यकारणीतून वगळण्यात आल्यामुळे सोलापूरातील शिंदे समर्थकांनी काँग्रेस भवनासमोर निदर्शने केली़ तसेच कार्यालयात तोडफोड देखील केल्याचं बोललं जात आहे.

शिंदे हे गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर आहेत. विशेष म्हणजे पक्षाने त्यांच्याकडून काही राज्यांचे प्रभारीपदही काढून घेतले आहे. त्यापाठोपाठ आता कार्यकारिणीतूनही वगळण्यात आल्याने कार्यकर्त्यांमधून नाराजी दिसून आली. दरम्यान, कार्यकर्त्यांच्या निदर्शनाबाबत सुशीलकुमार शिंदे यांनी याबाबत भाष्य करण्यास नकार दिला आहे.

दूध दरवाढीवर तोडगा नाहीच; पुण्यात दूध कोंडी होण्याची शक्यता

महाराष्ट्र केंद्रातून चालतो मुख्यमंत्री तर केवळ सांगकामे – राज ठाकरे