fbpx

मराठा आरक्षण : सोलापुरात होणाऱ्या जागरण गोंधळ आंदोलनात सुशीलकुमार शिंदे होणार सहभागी

सोलपुर : माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे देखील आता मराठा आंदोलनात सहभागी होणार आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आता तेही रस्त्यावर उतरणार आहेत. येत्या २९ जुलैला सोलापूरात होणाऱ्या जागरण गोंधळ आंदोलनावेळी ते भेट देणार आहेत.मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून येत्या २९ जुलैला सोलापुरात जागरण गोंधळ आंदोलन करण्यात येणार आहे.

मराठा क्रांती मोर्चा : आंदोलकांनी शिवेंद्रराजेंना बोलण्यापासून रोखलं

दरम्यान,अ‍ॅट्रॉसिटीबाबत न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिकेची मागणी मार्च महिन्यात शिंदे यांनी केली होती. न्यायालयाच्या निर्णयाबाबत मी बोलू शकत नाही. परंतु, भाजप सरकारने या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करायला हवी. पण, तसे होत नसल्याने कधी आंदोलन पेटेल हे सांगता येत नाही असं वक्तव्य करणारे शिंदे या आंदोलनाला हजेरी लावणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.शिंदे यांनी अ‍ॅट्रॉसिटीबाबत उधळलेल्या मुक्ताफळांमुळे सोशल मिडीयावर त्यांच्यावर चांगलीच टीका झाली होती.

अॅट्रॉसिटीच्या निर्णयाचा सुप्रीम कोर्टानं पुनर्विचार करावा- कॉंग्रेस

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या

  • मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
  • मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
  • राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
  • आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.
  • मौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.
  • अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.
  • आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.

अॅट्रॉसिटी निर्णय: सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार

…त्यांना फक्त फाशीच झाली पाहिजे;पिडीतेच्या आईची मागणी