सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे ?

सोलापूर : लोकसभेसाठी सोलापूर मतदारसंघातून पुन्हा सुशीलकुमार शिंदेच काँग्रेसकडून उमेदवार असणार आहेत, अशी महिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. २०१९च्या सोलापूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसकडे सुशीलकुमार शिंदे सोडून दुसरा सक्षम उमेदवारच नाही. त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. यापूर्वी शिंदे यांनी मी निवडणूक लढणार नाही असे जाहीर केले होते. परंतु सोलापूरचा गड परत काँग्रेसकडे आणायचा असेल तर शिंदे यांच्याशिवाय खमका उमेदवार नसल्याचे समजते आहे. शिंदे हेच सोलापूर मतदार संघातून निवडून येऊ शकतात असा विश्वास काँग्रेस नेते आणि कार्येकर्त्यांना आहे.

सोलापूर लोकसभा मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना आणि सुशीलकुमार शिंदे उमेदवार असताना २०१४मध्ये हा बाल्लेकिल्ला खालसा झाला आणि भाजपचे ऍड. शरद बनसोडे हे निवडून आले. अॅॅड. बनसोडे हे मोदी लाटेत आणि लोकांना बदल हवा होता म्हणून निवडून आले असल्याची चर्चा आहे. परंतु सुशीलकुमार शिंदे सारखा दिग्गज उमेदवार असताना काँग्रेसला इथे पराभवाला सामोरे जावे लागले होते. हि बाब काँग्रेससाठी तर धक्कादायक होतीच परंतु सुशीलकुमार शिंदे यांना हा फार मोठा धक्का होता.

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची राजकीय मोर्चेबांधणी, उमेदवार चाचपणी चालू आहे. गेल्या काही दिवसापूर्वी सोलापूर मतदारसंघासाठी उमेदवार चाचपणीसाठी काँग्रेसची बैठक पार पडली. यावेळी सुशीलकुमार शिंदे सोडून दुसरा उमेदवारच नसल्याचे समोर आले. त्यामुळे काँग्रेस पक्षासमोर दुसरा पर्यायच नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शिंदे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

दक्षिण सोलापूर , शहरामध्ये विधानसभा मतदार संघ, अक्कलकोट, मोहळ आणि मंगळवेढा या तालुक्यात काँग्रेसचे थोडे बहुत वर्चस्वव आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी स्वतः या मतदार संघात काँग्रेसची मोट बांधली आहे. त्याचा देखील शिंदे याना फायदा होणार आहे. त्यामुळेच सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बल्लेकिल्ला समजला जातो. २०१९ला हा मतदारसंघ परत काँग्रेसकडे आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

२०१४ पासून सोलापूरला ठोस असे काहीच झाले नाही. त्यामुळे या साडेचार वर्षात फक्त घोषणांचा पाऊस पडला आहे. विकासकामे मात्र तितकीशी झालेली दिसत नाहीत. त्यामुळे शिंदे यांच्या पराभवाचा फटका सोलापूरला बसल्याचे मत सोलापूरकरांचे झाले आहे. पुन्हा सुशीलकुमार शिंदेचा हवेत असे सोलापूकर म्हणताना दिसत आहेत. काही दिवसापूर्वी एक सर्वे झाला होता. त्या सर्व्हेतून सुशीलकुमार शिंदे यांनाच सोलापूरकरांनी पसंती दिल्याचे कळते आहे. त्यामुळे शिंदे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
सुशीलकुमार शिंदे हे उमेदवार असतील तर पक्षातील सर्व कार्येकर्ते, पदाधिकारी, नेते मनापासून कमला लागतील. कारण शिंदे यांचा स्वभाव आणि त्याच्यावरील सगळ्यांची श्रद्धा सगळ्या सोलापूरला महिती आहे.