काँग्रेसला मत दिल्यास भाजपाला जात ; सुशीलकुमार शिंदेंचा दावा

टीम महाराष्ट्र देशा : सकाळी मतदान सुरु झाल्यापासून अनेक ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाले आहेत. त्यामुळे मतदान करण्याची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे. काँग्रेसला मतदान केल्यास भाजपाला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान यंत्रांमध्ये घोटाळा असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या मुलाने केलेला असतानाच आता सुशीलकुमार शिंदे यांनीही तक्रार केली आहे. यामध्ये त्यांनी काँग्रेसला मतदान केल्यास भाजपला जात असल्याचा आरोपही केला आहे. याबाबतची तक्रार त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

सुजात आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना वंचित बहुजन आघाडीसमोरली बटण दाबले तरी मतदान कमळालाच जात आहे असा दावा केला आहे. सुजात पाठोपाठ प्रकाश आंबेडकर यांनीही मतदान यंत्रात घोळ असल्याचं म्हटलं आहे. मात्र, सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकाश आंबेडकर यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.