शेवटच्या निवडणुकीत शरद पवारांची साथ पाहिजे, सुशीलकुमार शिंदेंच भावनिक आवाहन

sushilkumar shinde1

सोलापूर: सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेस उमेदवार माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आज सोलापूरमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा घेतला आहे,  यावेळी बोलताना शिंदे यांनी आपल्याला शरद पवार यांनीच राजकारणात आणल्याची आठवण करून दिली, आता शेवटच्या निवडणुकीत शरद पवारांची साथ पाहिजे, असे भावनिक आवाहन त्यांनी केले आहे.

नौकरी करत असताना शरद पवार यांनी मला राजकारणात आणलं, आजवर मी अनेक वेळा निवडणुका लढविल्या, त्यावेळी पवार यांनी माझी साथ सोडली नाही, आता शेवटच्या निवडणुकीमध्ये मला त्यांचा आशीर्वाद पाहिजे, असल्याचं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

वंचितमुळे सुशीलकुमारांच्या अडचणीत वाढ
सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये कॉंग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे तर भाजपकडून जयसिद्धेश्वर स्वामी यांच्यामध्ये सरळ लढत होण्याची शकता वर्तवण्यात येत होती, मात्र वंचित बहुजन आघाडीकडून स्वतः प्रकाश आंबेडकर यांनीच मैदानात उतरत दंड थोपटल्याने शिंदे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.