डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाने जातीयवादी शक्तींशी हातमिळवणी केली – सुशीलकुमार शिंदे

टीम महाराष्ट्र देशा : सोलपुर लोकसभा मतदारसंघामध्ये चांगलीच रंगत चढली असून वंचित बहुजन आघाडी आणि कॉंग्रेस आघाडी यांनी चांगलाच प्रचाराचा धडाका लावला आहे. तर आज आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकश आंबेडकर यांच्यावर सडकून टीका केली आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी जातीयवादी शक्तींशी हातमिळवणी केली आहे असे शिंदे म्हणाले आहेत. सुशीलकुमार शिंदे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी शिंदे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तीन वर्षे अभ्यास करून देशाला राज्यघटना दिली. मात्र डॉ. आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी जातीयवादी शक्तींशी हातमिळवणी केली आहे. तसेच प्रकश आंबेडकर यांनी सेक्युलर मतांची विभागणी करण्यासाठी निवडणुकीत भाग घेतला आहे. कारण प्रकाश आंबेडकर हे भाजपने सोडलेले पिल्लू आहे. असे देखील ते म्हणाले. तर भाजप विषयी बोलताना शिंदे म्हणाले की, केवळ जातीय समीकरणे डोळ्यांसमोर ठेवून भाजपाकडून जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्हिजन नाही. असा देखील टोला यांनी यावेळी लगावला आहे.

दरम्यान सोलापूर लोकसभा मतदार संघात यंदा चुरशीची लढाई पाहिला मिळणार आहे. तर यावेळी सोलापूर मध्ये तिहेरी लढत होणार आहे.कॉंग्रेस आघाडीकडून ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे हे रिंगणात उतरले आहेत तर त्यांना टक्कर देण्यासठी भाजप कडून डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर खुद्द या दोन बड्या पक्षांना शह देण्यासठी आपले आंबेडकरवादी विचार घेऊन रिंगणात उतरून सोलापुच्या जनते समोर आपला तिसरा पर्याय ठेवला आहे.