सोलापुरातून सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल

blank

टीममहाराष्ट्र देशा: सोलापुर लोकसभेसाठी आज माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांनीही अर्ज भरला. मागील लोकसभा निवडणुकीत शरद बनसोडे यांनी सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला होता.

यावेळी सोलापुरात तिरंगी लढत होणार आहे. भाजपतर्फे जयसिद्धेश्वर स्वामी, वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर तर कॉंग्रेसतर्फे सुशीलकुमार शिंदे मैदानात आहेत. प्रकाश आंबेडकर हे पहिल्यांदाच अकोल्याच्या बाहेर लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या या निर्णयामुळे सुशीलकुमार शिंदे यांची डोकेदुखीत वाढ झाली आहे.