CWG2018: सुशील कुमारची सुवर्णपदकाची हॅटट्रीक, बबिता फोगाटला रौप्यपदक

टीम महाराष्ट्र देशा- कुस्तीपटू सुशील कुमारनं राष्ट्रकुल स्पर्धेत ७४ किलो फ्रीस्टाईलमध्ये सुशील कुमारनं सुवर्णपदक जिंकलं आहे. सुशील कुमारनं अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्नेस बोथाचा १०-० असा धुव्वा उडवला आहे.तर दुसऱ्या बाजूला भारताची महिला गटातीला आघाडीची कुस्तीपटू बबिता फोगाटचे राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालण्याचे स्वप्न भंगले आहे. महिलांच्या 53 किलो वजनी गटात बबिताने धडाकेबाज कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत मुसंडी मारली होती. मात्र अंतिम लढतीत बबिताला कॅनडाच्या कुस्तीपटूकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे बबिताला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

सुशीलच्या कामगिरीने कुस्तीत भारताने आतापर्यंत ४ पदक मिळवलं आहे. याचसोबत २९ पदकांसह भारताने पदकतालिकेत आपलं स्थान अजुन भक्कम केलं आहे. राहुल आवारेपाठोपाठ सुशील कुमारनेही कुस्तीत भारताला सुवर्णपदकाची कमाई करुन दिली आहे.

bagdure

महिलांच्या 53 किलो फ्री स्टाईल कुस्तीत बबिता कुमारीने सलग तीन विजय मिळवत फायनलमध्ये धडक मारली होती. मात्र सलग तीन कुस्त्या खेळल्यामुळे, बबिता काहीशी दमलेली दिसत होती.
त्यामुळे डायना विकरने त्याचा फायदा घेत, पहिल्यापासूनच आक्रमक कामगिरी केली. डायना आधी 1-0 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर दोघींना 2-2 गुण मिळाल्याने बबिता 2 आणि डायना 3 असे गुण झाले.मात्र अखेरच्या मिनिटात दोघींमध्ये तुफान झटापट झाली. यामध्ये पुन्हा डायनाने 2 गुणांची कमाई करत निर्णायक आघाडी घेतली.

या लढतीत बबिताने कॅनडाच्या डायना वेईकेरला कडवी झुंज दिली. सुरुवातीला चुरशीच्या झालेल्या या लढतीत बबिताने एकवेळ 2-1 अशी आघाडी मिळवली होती. मात्र डायनाने पलटवार करताना सलग तीन गुण घेत बबिताला पराभवाचा धक्का दिला.

दरम्यान राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीपटू राहुल आवारेनं सुवर्णपदक पटकावले आहे. राहुलनं ५७ किलो वजनी गटात कॅनडाच्या स्टिफन ताकाहशीचा पराभव केला. १५ -७ अशा गुणांच्या फरकाने विजय मिळवत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक जमा केलं.

 

You might also like
Comments
Loading...