सुशांतसिंग प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्या, नितीशकुमार यांची केंद्राकडे शिफारस

nitish kumar and sushant singh rajput

पटना- बॉलिवूड अभिनेता सुशात सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटण्याहून मुंबईत आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला रविवारी रात्री मुंबई महापालिकेने क्वारंटाइन केलं. त्यावरून सोमवार सकाळपासून बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या प्रकरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, आता या तपास सीबीआयला सोपवण्याची शिफारस बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली आहे. मंगळवारी सुशांतच्या कुटुंबाच्या मागणीवर नितीश कुमारांनी हा निर्णय घेतला. बिहारमधील सत्तारुढ पक्ष जेडीयूचे प्रवक्ता संयज सिंह यांनी याबाबतची माहिती दिली. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी बिहार सरकारने सीबीआय चौकशीसाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान,सुशांतसिंहच्या आत्महत्येच्या प्रकरणावरून सध्या राज्यातील राजकारण तापलं आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी विरोधी पक्ष भाजपसह काही मंडळी करत आहेत. तर, मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यास सक्षम आहेत, असं राज्य सरकारचं म्हणणं आहे.

या प्रकरणाच्या तपासासाठी सोमवारी मुंबईत आलेल्या बिहारी पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाइन केल्यामुळं आरोप-प्रत्यारोपाला जोर चढला आहे. महाराष्ट्र सरकार नेमकं काय लपवतंय, असा सवाल भाजपनं केला होता.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

रस्त्यावरील खड्डे आणि तुंबलेल्या पाण्यातून मुंबईकरांची सुटका कधी?