सुशांत सिंह राजपुत ! अभिनेत्याची न संपलेली कथा

sushant rajput

मुंबई : मागील वर्षी कोरोना संसर्गाच्या काळात अनेक कलाकांराचे निधन झाले. यात दोन कलाकारांचे निधन चाहत्यांच्या मनाला चटका लावुन गेले. यात पहिले नाव होत इरफान खान यांचे तर दुसऱे सुशांत सिंह राजपुत यांचे. इरफान खान यांचे निधन हे आजारपनामुळे झाले. मात्र सुशांत सिंह राजपुतने आत्महत्या केली अशी माहिती समोर आली होती.

१४ जुन २०२० म्हणजेच आजच्या दिवशी संपुर्ण बॉलिवुड जगताला हादरवुन टाकणारी घटना समोर आली. बॉलीवुडचा आघाडीचा अभिनेता सुशांत सिंह राजपुत याने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली अशा बातम्या सगळीकडे प्रसारित होऊ लागल्या. काही काळ चाहत्यांना विश्वासच बसला नाही की असे काही घडले असेल. या घटनेला एक वर्ष पुर्ण झाले आहे. मात्र अद्यापही सुशांतने आत्महत्या केली होती का त्याचा खुन याचा उलगडा होऊ शकला नाही.

सुशांतच्या जाण्यामुळे अनेक तर्क वितर्क लावेल गेले. काही सुत्रांच्या मते बॉलीवुडमधील घराणेशाहीने त्याचा जिव घेतला. तर काही सुत्रांच्या मते तो ड्रग्जच्या आहारी गेला होता. त्यामुळे नैराश्यातुन त्याने टोकाचे पाऊल उचलले. आजही त्याचे सहअभिनेते त्याची आठवण काढत असतात. त्याच्या निकटवर्तीयांनी तो आत्महत्या करु शकतो या गोष्टीचा इन्कार केला. या दरम्यान त्याच्या मृत्युचा छडा लावण्यासाठी अनेक यंत्रणा कामाला लागल्या मात्र परिणाम शुन्य. सुशांतच्या अवेळी जाण्यामुळे बॉलीवुडमध्ये दोन गट पडलेले बघायला मिळाले. यात कंगणा रणावत बॉलीवुडच्या घराणेशाहीवर सतत आरोप करत राहिली. मात्र बिहार पोलिस, महाराष्ट्र पोलिस, सीबीआय यांनी अद्यापही या प्रकरणावर पडदा टाकलेला नाही.

सुशांतने आपल्या छोटेखानी कारकिर्दीत छोट्या पडद्यापासुन सुरुवात केली. पवित्र रिश्ता या मालिकेद्वारे तो घराघरात पोहोचला. यानंतर काय पो छे या चित्रपटाद्वारे बॉलीवुडमध्ये पदार्पण केले. यानंतर काही वर्षानी आलेल्या एम एस धोनी चित्रपटाने तो यशाच्या शिखरावर पोहोचला. यानंतर त्याने सोनचिरीया या चित्रपटात नक्षलवाद्याची भूमिका साकारत अभिनयाची चमक दाखवली. यानंतर आलेल्या छिछोरे या चित्रपटाने प्रेक्षकांची त्याने वाहवा मिळवली. यानंतर त्याचा ड्राईव्ह चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. हाच त्याचा अखेरचा चित्रपट ठरला. त्याच्या मृत्युनंतर त्याचा अखेरचा चित्रपट ‘दिल बेचारा’ प्रदर्शित झाला. सुशांत राजपुत जरी काळाच्या पडद्याआड गेला असेल, तरी त्याच्या अभिनयाद्वारे त्याची कहाणी ही कधीच संपणार नाही.

महत्वाच्या बातम्या

IMP