सुशांत-सारा केदारनाथच्या सेटवर घेत होते ड्रग्स? ; ‘या’ अभिनेत्याने केला धक्कादायक खुलासा

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधले ड्रग्ज कनेक्शन समोर आले आहे. यानंतर एनसीबीने धडक कारवाई सुरू केली आहे. याप्रकरणी बऱ्याच बॉलीवूड कलाकारांची नवे समोर आली. या प्रकरणात सुशांतची कथित गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे नाव समोर आलं होतं. त्यांनतर रिया चक्रवर्तीला काही दिवस कोठडी देखील सुनावली होती.

दरम्यान, रियाने NCB ला दिलेल्या जबाबात असं म्हटलं आहे, की ‘केदारनाथ’ या चित्रपटावेळी अभिनेत्री सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत दोघेही ड्रग्स घेत होते. केदारनाथमध्ये साराच्या वडिलांची भूमिका साकारणारे अभिनेता नितीश भारद्वा  यांनी याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

नुकताच नितीश भारद्वाज यांनी एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती खुलासा केला आहे. नितीश यांनी म्हटलं आहे, की ‘केदारनाथच्या सेटवर अभिनेत्री पूजा गौर आणि माझ मनोरंजन क्षेत्रातील बदलत्या गोष्टींवर बोलणं सुरु होतं. आणि बोलता बोलता आमच्यामध्ये ड्रग्सच्या मुद्द्यावरसुद्धा बोलन झालं. तेव्हा सारा आम्हाला म्हणाली की, ‘मीसुद्धा चित्रपटसृष्टीतील ड्रग्सच्या प्रभावाबद्दल ऐकलं आहे. यावर मी साराला स्पष्ट शब्दांत सांगितल होतं, की तू अशा गोष्टींपासून नेहमी दूर राहा.

यावर मला साराने खूपच विश्वासाने सांगितलं होतं, की मी अशा कोणत्याही गोष्टींच्या आहारी कधीच जाणार नाही. आणि मी आजपर्यंत कधी ड्रग्स बघितलेही नाहीत’. तसेच सुशांतबद्दल बोलताना ते म्हणाले,  सुशांतबद्दल सांगायचं तर तो स्मोक करत होता. मात्र ते ड्रग्स नव्हते. तसेच सेटवर सारा आणि सुशांत नेहमीच असायचे आणि नॉर्मलदेखील असायचे. ड्रग्स घेणारे लोक इतके नॉर्मल असूचं शकत नाही असं मला वाटत. असं मत नितीश भारद्वाज यांनी खुलासा केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP