Share

Suryakumar Yadav | ICC टी-20 रँकिंगमध्ये सूर्यकुमार यादव नंबर 1 वर कायम

टीम महाराष्ट्र देशा: भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेमध्ये स्फोटक कामगिरी केल्यानंतर सूर्यकुमार यादवने अलीकडे झालेल्या न्यूझीलंड (Newzealand) विरुद्धच्या सामन्यांमध्ये शानदार फलंदाजी केली होती. यामध्ये त्याने दोन सामन्यात शतकासह 124 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत आयसीसी (ICC) ने जाहीर केलेल्या ताज्या टी-20 क्रमवारीत (Ranking) सूर्यकुमार यादवने आपले पहिले स्थान कायम ठेवले आहे.

न्यूझीलंडमध्ये केलेल्या स्फोटक कामगिरीनंतर सूर्यकुमार यादवने ताज्या क्रमवारीमध्ये आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम 895 गुण गाठले आहे. आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी मिळवलेला हा दुसरा सर्वोत्तम स्कोर आहे. सूर्यकुमारच्या आधी विराट कोहलीने 897 गुण मिळवून तो नंबर-1 बनला होता. दरम्यान, पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिजवान 836 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे.

या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर डेव्हॉन कॉनवे 788 गुणांसह आहे. तर 778 गुणांसह पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीमध्ये भारतीय संघातील ईशान किशन 33 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत भाग न घेतल्याने विराट कोहली दोन स्थानांनी मागे घसरला आहे. सध्या विराट कोहली या यादीमध्ये तेराव्या क्रमांकावर आहे. आयसीसीच्या ताज्या रँकिंगमध्ये फलंदाजीच्या टॉप 10 यादीमध्ये फारसा बदल झालेला नाही.

या यादीमध्ये गोलंदाजी क्रमवारीमध्ये श्रीलंकेचा वानिंदू हसरांगा पहिल्या क्रमांकावर आहे. तर राशीद खान दुसऱ्या क्रमांकावर असून आदिल राशीद तिसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान, या यादीमध्ये पहिल्या दहा गोलंदाजामध्ये भारतीय संघातील एकही गोलंदाज नाही. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीमध्ये भारतीय संघाचा हार्दिक पांड्या तिसऱ्या क्रमांकावर असून मोहब्बत नावी दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये शाकिब अल हसन पहिल्या क्रमांकावर आहे.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. टी-20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेमध्ये स्फोटक …

पुढे वाचा

Cricket Sports

Join WhatsApp

Join Now