टीम इंडियात निवड होताच सुर्यकुमारची तुफानी खेळी; असा केला आनंद साजरा

सूर्यकुमार

मुंबई : सध्या इंग्लंड क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर उभय संघांमध्ये पाच टी२० सामन्यांची टी२० मालिका खेळविली जाईल. या मालिकेसाठी शुक्रवारी (१९ फेब्रुवारी) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यात मुंबईकर सूर्यकुमार यादवला इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत स्थान मिळाले आहे. बीसीसीआयची निवड समिती टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी सूर्यकुमार यादवला संधी देली गेली आहे. बीसीसीआयला आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी तगडा संघ उभा करायचा आहे.

त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकणारे तसेच आयपीएलमध्ये चमकलेल्या खेळाडूंना संधी दिली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच सूर्यकुमार यादव याला देखीलया मालिकेत संधी दिलेली आहे. भारतीय संघ कसोटी मालिकेनंतर इंग्लंडविरुद्ध ५ टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. यामध्ये सूर्यकुमार यादवला संधी मिळालेली.

भारतीय संघात प्रथमच निवड झाल्याचा आनंद सूर्यकुमारने अनोख्या पद्धतीने साजरा केला. सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये आक्रमक अर्धशतक ठोकून त्याने हा आनंद व्यक्त केला. जयपूर येथील जयपुरिया महाविद्यालयाच्या मैदानावर दिल्ली विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ३३ चेंडूंमध्ये ५० धावांची तुफानी खेळी केली. सलामीवीर पृथ्वी शॉने या सामन्यात शतक झळकावले. या सामन्यात मुंबईने ७ गडी राखून मोठा विजय मिळवला.

इंग्लंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारताचा संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, कक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.

महत्वाच्या बातम्या