मुंबई : शिवसेनेतील अंतर्गत वाद आज शिवसेनेचे नेते रामदास (Ramdas Kadam) यांच्या पत्रपरिषदेत उफाळून आलेत. रामदास कदम परिवहन मंत्री अनिल परबांना हरामखोर म्हणाले आहेत. रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना अक्षरश: अनिल परब यांच्या बापाचाही उल्लेख केला आहे. हिंमत असेल तर वांद्र्यातून निवडणूक लढण्याचे आव्हान दिले आहे.
रामदास कदम आणि परब यांच्यातील वाद आता उघड वाद सुरू होण्याची शक्यता आहे. ‘अनिल परब यांच्या डोक्यात मस्ती गेली आहे. हवा गेली. त्यांचे पाय जमिनीवर नाही. मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. त्यात परब यांना हरामखोर म्हटलं. या हरामखोराला आवरा’, असे रामदास कदम म्हणाले आहेत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर माजी आमदार सुर्यकांत दळवी यांनी रामदास कदम हेच शिवसेनेतील मोठे महागद्दार असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. ज्यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना सोडली, तेव्हा रामदास कदमही शिवसेना सोडणार होते. मात्र पक्षाने विरोधी पक्षनेतेपद दिल्यामुळे ते पक्षातच थांबले. कदम यांनी वारंवार शिवसेना विरोधात गद्दारी केली होती. त्याचे अनेक उदाहरणे आपण देऊ शकतो. शिवसेनेमध्ये गद्दार दुसरं तिसरं कोणी नसून फक्त रामदास कदम हेत महागद्दार आहेत, अशा शब्दात सुर्यकांत दळवी यांनी रामदास कदम यांच्यावर पलटवार केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- रामदास कदमांच्या टीकेवर अनिल परबांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- ‘हे हारमखोर, बेईमानी मंत्री राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांसोबत मला आणि शिवसेनेला संपवण्याचा घाट घालत आहेत’
- अमित शहांचा महाराष्ट्र दौरा; सहकार वाचवण्यासाठी सांगितला नवा प्लान
- सहकार क्षेत्रात जो पक्षपात होतोय, त्यात मी मूकदर्शक बनून राहू शकत नाही- अमित शहा
- सुहास दाशरथेंना औरंगाबादेत मनसे देणार नवीन जबाबदारी; राज ठाकरेंच्या सूचना!
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<