आश्चर्यच ! खऱ्या कोरोना योद्धांना नियुक्ती झाल्यापासुन एक दिवसाचेही मानधन नाही

औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद महानगरपालिकातंर्गत विलगीकरण, लसीकरण व इतर कोविड सेंटर येथे अहोरात्र वैद्यकीय सेवा देणाऱ्या सर्व कंत्राटी आयुष डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे थकीत असलेले मानधन अथवा वेतन त्वरीत अदा करण्याचे सुचित केले आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी आणि मनपा प्रशासकांना पत्र पाठवले आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेल्या पत्रात नमुद केले की, कोविड-१९ संसर्ग विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औरंगाबाद महानगरपालिकातंर्गत विलगीकरण, लसीकरण व इतर कोविड सेंटर येथे अहोरात्र वैद्यकीय सेवा देत असलेल्या सर्व आयुष डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मानधन अथवा वेतन दिनांक १६ मार्च २०२१ रोजी नियुक्ती झाल्यापासुन प्रलंबितच आहेत. नियुक्ती झाल्यापासुन सदरील सर्व डॉक्टर्सनी मागणी करुन सुध्दा त्यांना त्यांचे हक्काचे वेतन अथवा मानधन आजतागायत देण्यात आलेले नाही.

मानधन अथवा वेतन वेळेवर न मिळाल्यामुळे सदरील सेवा देत असलेल्या डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट ओढावलेले आहे. कोरोना विषाणुची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घालुन रुग्णसेवा देत असतांना सुध्दा त्यांना वेळेवर त्यांचे मानधन अथवा वेतन मिळालेले नाही, ही बाब अत्यंत निंदनीय व गंभीरस्वरुपाची असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेल्या पत्रात नमुद केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP