बिग बॉसच्या घरातून सुरेखा पुणेकरला निरोप

टीम महाराष्ट्र देशा : रविवारी बिग बॉसच्या घरातून सुरेखा पुणेकरची एक्झिट झाली आहे. नॉमिनेशनमध्ये हिना पांचाळ, रुपाली भोसले, वैशाली म्हाडे, किशोरी शहाणे आणि सुरेखा पुणेकर हे होते. ज्यामध्ये वैशाली म्हाडे आणि सुरेखा पुणेकर हे डेंजर झोनमध्ये होते. मात्र अखेर महेश मांजरेकरांनी सुरेखा ताईंना घराबाहेर येण्यास सांगितलं. संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकणाऱ्या सुरेखा यांनी घरातील स्पर्धकांची आणि प्रेक्षकांचीही मनं जिंकली.

सुरेखा ताईला निरोप देताना घरातील सगळेच सदस्य भावूक झाले होते, याचे कारण सुरेखा पुणेकर या घरातील सर्वात मोठ्या व्यक्ती होत्या. सर्व सदस्यांना त्यांच्या विषयी प्रेम,आदर होता. अखेरचा ताईला निरोप देताना सर्वांचे डोळे भरून आहे. ‘ही सुरेखा आपल्याला पटलेली हाय’ म्हणत गोड निरोप ताईला सर्व सदस्यांनी दिला