सरकारकडे मदत न मागता, सुरेखा पुणेकर यांनी जनतेला केलं ‘हे’ आवाहन; पोलिसांना ठोकला ‘सलाम’

मुंबई : संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने गावातील गरीब व रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबाला दोन वेळेच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांना याचप्रमाणे लोककलावंतांना देखील ‘कोरोना’चा जबर फटका बसला आहे.

तसेच कोरोना’शी लढा देण्यासाठी सरकार सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे शेतकरी, लहान उद्योग, सर्वच क्षेत्रांवर कोरोनामुळे आर्थिकदृष्ट्या परिमाण झाला आहे. या कठीण परिस्थितीत सर्वजण सरकारकडे आर्थिक मदतीचा हात मागत आहे. मात्र लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर याला अपवाद ठरल्या आहेत.

‘महाराष्ट्र देशा’ने सुरेखा पुणेकर यांच्याशी सविस्तर बातचीत केली. यावेळी बोलताना सुरेखाताईंनी सरकारकडे कोणतीही आर्थिक मदत मागितली नसून आम्ही सर्व कलावंत सरकारसोबत आहोत, सरकारलाच आम्हाला मदत करायची आहे, अशी सकारात्मक भूमिका आमच्याशी बोलताना सुरेखाताईंनी मांडली. त्यांच्या या भूमिकेमुळे पुन्हा एकदा ताईंचा दिलदारपणा, समाजाविषयी असलेली कृतज्ञता समोर आली.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘कोरोना’रूपाने आपल्यावर हे एक नैसर्गिक संकट आलं आहे. देशासह कलावंतांवर देखील हे संकट आलं आहे. सरकारने या परिस्थितीत चांगले लक्ष द्यावं. जे नागरिक जीव धोक्यात घालून गावी जाण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्याकडे प्रामुख्याने लक्षकेंदित करावं,’ असं मोलाचं, कळकळीच आवाहन सुरेखाताईंनी सरकारला केलं आहे.

दरम्यान, ‘नागरिकांनी स्व:ताची काळजी घ्यावी. आपल्या आरोग्यासाठी पोलीस स्व:ताचे आरोग्य, कुटुंब धोक्यात घालून बाहेर काम करत आहे, त्यांना माझा सलाम…तसेच ‘करोना’ने सर्वच ठप्प झालं आहे, मात्र आपण सर्वांनी एकजुटीने याचा सामना केला तर नक्की यश मिळेल, असा विश्वास सुरेखाताईंनी व्यक्त केला.

लॉकडाऊन असल्याने सर्व उरूस, यात्रा रद्द झाल्याने याचा कलावंतांवर कसा परिमाण झाला ? असं विचारलं असता सुरेखाताई म्हणाल्या, ‘मार्च ते मे महिन्यात फुल्ल तारखा असतात. आणि त्यानंतर जून महिन्याच्या साधारण ७-८ तारखेपर्यंत कार्यक्रम होतात, आणि पुढच्या वर्षीच्या मार्च महिन्यापर्यंत आम्ही कलावंत यावर जगत असतो,’ अशी माहिती सुरेखाताईंनी बोलताना दिली.

‘बाहेर पडू नका, सरकारला सहकार्य करा, स्व:ताची काळजी घ्या, ‘कोरोना’शी लढा देण्यासाठी आपण सर्व एक झालोचं आहोत अशीच ही आपली एकजूट कोरोना’वर मत करण्यास मदत करेल. त्यामुळे सर्वांनी कुटुंबाची काळजी घ्या,’ असं आवाहन लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी ‘महाराष्ट्र देशा’शी बोलताना जनतेला केलं.