fbpx

#SurgicalStrike2: ‘या’ दोन भारतीय महिलांनी शिकविला पाकिस्तानला धडा

टीम महाराष्ट्र देशा – पुलवामा येथील सीआरपीएफ हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून पाकिस्तानवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. यामध्ये आता भारताकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये फायटर जेट्सच्या माध्यमातून तब्बल एक हजार किलोचे बॉम्ब अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर बरसवण्यात आले आहेत. कारगिल युद्धानंतर प्रथमच फायटर जेटच्या माध्यमातून करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

या हल्ल्यानंतर दोन भारतीय महिलांनी पाकिस्तानला धडा शिकविला असल्याचे  म्हटले जात आहे. केंद्रिय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि केंद्रिय संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन याच खऱ्या यशाच्या शिल्पकार असल्याचे मानले जात आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी कूटनीतीद्वारे पाकला आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटं पाडलं आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी आक्रमक भूमिका घेत पाकवर हल्ला चढवला, आजचा हल्ला हा त्याचाच परिपाक होता.

सोमवारी मध्यरात्री हवाई दलाच्या १२ मिराज विमानांनी पाकव्याप्त कश्मीरात घुसुन जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर १००० किलोच्या बॉम्बने हवाई हल्ले केले. अवघ्या २१ मिनिटात हवाई दलाने जैशचे तळ नेस्तनाबूत केले आहेत.

त्यामध्ये जवळजवळ ३०० दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. आपली सर्व विमाने सुखरूप परत आली. यामध्ये जैश ए मोहम्मद, हिजाबुल मुझाहिद्दीन, लष्करे ए तोयबा अशा अनेक अतिरेकी संघटनांचे कंबरडे मोडले आहे.

पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देश दु:खात होता. परंतु असे असताना संपूर्ण देश सैन्याच्या पाठीशी उभा राहिला होता. कोणतेही राजकारण न करता सर्व भारतीय जनता आणि सर्वच राजकीय पक्ष त्यांच्या पाठीमागे उभे राहिले होते.