#SurgicalStrike2: “भारताला योग्य त्यावेळी, स्वत:च्या पसंतीच्या ठिकाणी प्रत्युत्तर देऊ”

blank

लाहोर- भारत देशाने अवाजवी आक्रमकता दाखवली आहे. पाकिस्तान भारताला योग्य त्यावेळी व स्वत:च्या पसंतीच्या ठिकाणी प्रत्युत्तर देईल, असा इशारा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिला आहे.

सोमवारी मध्यरात्री हवाई दलाच्या १२ मिराज विमानांनी पाकव्याप्त कश्मीरात घुसुन जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर १००० किलोच्या बॉम्बने हवाई हल्ले केले. अवघ्या २१ मिनिटात हवाई दलाने जैशचे तळ नेस्तनाबूत केले आहेत.

यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची तातडीची बैठक घेतली असून पुढील रुपरेषा ठरविण्याची शक्यता आहे.

ही राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक झाल्यानंतर इम्रान खान यांनी भारताला धमकी दिली आहे. त्याचबरोर, पाकिस्तनी सेनेला आणि जनतेला सज्ज राहण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. यावरून भारताने केलेल्या हल्यानंतर पाकिस्तान बिथरला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. भारताच्या कारवाईने पाकिस्तानला धडकी भरली असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या हालचालीवरून जाणवत आहे.

पुलवामा येथील सीआरपीएफ हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून पाकिस्तानवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. यामध्ये आता भारताकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये फायटर जेट्सच्या माध्यमातून तब्बल एक हजार किलोचे बॉम्ब अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर बरसवण्यात आले आहेत. कारगिल युद्धानंतर प्रथमच फायटर जेटच्या माध्यमातून करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

त्यामध्ये जवळजवळ ३०० दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. आपली सर्व विमाने सुखरूप परत आली. यामध्ये जैश ए मोहम्मद, हिजाबुल मुझाहिद्दीन, लष्करे ए तोयबा अशा अनेक अतिरेकी संघटनांचे कंबरडे मोडले आहे.