#SurgicalStrike2: शर्म करो, शर्म करो, इम्रान खान शर्म करो… पाकिस्तानातील संसेदेत नारे

इस्लामाबाद – पुलवामा येथील सीआरपीएफ हल्ल्यानंतर भारताने सोमवारी मध्यरात्री हवाई दलाच्या १२ मिराज विमानांनी पाकव्याप्त कश्मीरात घुसुन जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर १००० किलोच्या बॉम्बने हवाई हल्ले केले. अवघ्या २१ मिनिटात हवाई दलाने जैशचे तळ नेस्तनाबूत केले आहेत.

Loading...

त्यानंतर त्याचे पडसाद पाकिस्तानमधील संसदेत आज उमटलेलेले पाहवयास मिळाले. संसदेचे कामकाज सुरू होताच शर्म करो, शर्म करो, इम्रान खान शर्म करो… असे नारे विरोधकांनी लगावले.

पाकिस्तानमधील संसेदेचे कामकाज सुरू होताच इम्रान खान विरोधकांनी इम्रान खान यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी म्हणाले, भारताने सीमेचे उल्लंघन करताना आपल्या हद्दीत येऊन हल्ला केला आहे. पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याचा हक्क आहे.

पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष शेरी रहमान म्हणाले, ‘भारताने चुकीच्या पद्धतीने घुसखोरी करून हल्ला केला आहे. भारताचे हे चुकीचे पाऊल आहे. यामुळे शांततेऐवजी अशांतता निर्माण होईल. भारतातील सत्ताधारी पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी युद्धाच्या दिशेने पाऊल टाकत आहे.’

कारगिल युद्धानंतर प्रथमच फायटर जेटच्या माध्यमातून करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. त्यामध्ये जवळजवळ ३०० दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. आपली सर्व विमाने सुखरूप परत आली. यामध्ये जैश ए मोहम्मद, हिजाबुल मुझाहिद्दीन, लष्करे ए तोयबा अशा अनेक अतिरेकी संघटनांचे कंबरडे मोडले आहे.Loading…


Loading…

Loading...