#SurgicalStrike2: भारताला मोठं यश; मसूद अझरच्या दोन भावांचा हल्ल्यामध्ये खात्मा

नवी दिल्ली – सोमवारी मध्यरात्री हवाई दलाच्या १२ मिराज विमानांनी पाकव्याप्त कश्मीरात घुसुन जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर १००० किलोच्या बॉम्बने हवाई हल्ले केले. अवघ्या २१ मिनिटात हवाई दलाने जैशचे तळ नेस्तनाबूत केले आहेत. यामध्ये भारताला मोठं यश मिळालं असून जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरच्या 2 भावांना ठार करण्यात भारताला यश आलं आहे.

इब्राहिम अझर आणि मौलाना सैफ असं मसूद अझरच्या भावांचं नाव असून दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यात ते मारले गेल्याचं सांगण्यात येत आहे.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्लात ४० जवान मारले गेले होते. भारताने याचा बदला म्हणून १२  व्या दिवशी पाकिस्तानला अद्दल घडवली आहे.

पुलवामा येथील सीआरपीएफ हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून पाकिस्तानवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. यामध्ये आता भारताकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये फायटर जेट्सच्या माध्यमातून तब्बल एक हजार किलोचे बॉम्ब अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर बरसवण्यात आले आहेत. कारगिल युद्धानंतर प्रथमच फायटर जेटच्या माध्यमातून करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.