#SurgicalStrike2: देशभरात हाय अलर्ट; सीमेवर गोळीबार सुरू

टीम महाराष्ट्र देशा – पुलवामा येथील सीआरपीएफ हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून पाकिस्तानवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. यामध्ये आता भारताकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये फायटर जेट्सच्या माध्यमातून तब्बल एक हजार किलोचे बॉम्ब अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर बरसवण्यात आले आहेत.

Loading...

त्यानंतर देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. या हवाई हल्ल्यानंतर सीमारेषेवरील तणावात वाढ झाली आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. पंजाबमधील पठाणकोट, बनासकांठा, भोपाळ, धरमशाला हवाई तळांवरही अलर्ट जारी करण्यात आला असून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पाकिस्तानकडून सुरू असलेल्या गोळीबाराला भारतीय सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. जम्मूच्या कनाचक आणि सांबा सेक्टरमध्ये दोन्ही बाजूंकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू आहे.

भारताने पाकिस्तानच्या गोळीबाराला दिलेल्या प्रत्युत्तरात एक पाकिस्तानी रेंजर ठार झाला आहे. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत सकाळी 6 वाजता जम्मू कश्मिरच्या राजौरी आणि पूंछ सेक्टरमध्ये गोळीबाराला सुरुवात केली. सकाळपासून दोन्ही बाजूंकडून थोड्या थोड्या वेळाने गोळीबार सुरू आहे.

दरम्यान, सोमवारी मध्यरात्री हवाई दलाच्या १२ मिराज विमानांनी पाकव्याप्त कश्मीरात घुसुन जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर १००० किलोच्या बॉम्बने हवाई हल्ले केले. अवघ्या २१ मिनिटात हवाई दलाने जैशचे तळ नेस्तनाबूत केले आहेत. त्यामध्ये जवळजवळ ३०० दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. आपली सर्व विमाने सुखरूप परत आली. यामध्ये जैश ए मोहम्मद, हिजाबुल मुझाहिद्दीन, लष्करे ए तोयबा अशा अनेक अतिरेकी संघटनांचे कंबरडे मोडले आहे.Loading…


Loading…

Loading...