fbpx

#SurgicalStrike2: अजित डोवाल ‘सर्जिकल स्ट्राईकचे २’चे खरे सुत्रधार

टीम महाराष्ट्र देशा – सोमवारी मध्यरात्री हवाई दलाच्या १२ मिराज विमानांनी पाकव्याप्त कश्मीरात घुसुन जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर १००० किलोच्या बॉम्बने हवाई हल्ले केले. अवघ्या २१ मिनिटात हवाई दलाने जैशचे तळ नेस्तनाबूत केले आहेत.

त्यामध्ये जवळजवळ ३०० दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. आपली सर्व विमाने सुखरूप परत आली. यामध्ये जैश ए मोहम्मद, हिजाबुल मुझाहिद्दीन, लष्करे ए तोयबा अशा अनेक अतिरेकी संघटनांचे कंबरडे मोडले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या मोहिमेत भारतीय सैन्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले. तसेच, भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीही या मोहिमेत महत्वाची भूमिका असल्याचे समजते.

विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या कारवाईच्या नियोजन करते वेळी उपस्थित होते.सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार पुलवामा येथील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी संरक्षण मंत्र्यांना काही विकल्प देण्यात आले होते. यानंतर वायुसेना आणि लष्कर यांनी ड्रोनच्या सहाय्याने एलओसीजवळ हवाई पाहणी केली. या ड्रोन द्वारे दहशतवाद्यांच्या अड्ड्यांचा वेद घेण्यात आला. या अड्ड्यांची माहिती भारतीय लष्कराला २० फेब्रुवारीलाच मिळाली होती. मुख्य हल्ला करताना सर्वप्रथम रिफ्युलर टॅंकद्वारे ट्रायल उड्डाण घेतले गेले. मुख्य हल्ला केला त्यावेळी वायुसेनेने लेजर गायडेड बॉम्बचा वापर केला.

भारतीय लष्कराचे या कामगिरीबद्दल कौतुक होत असतानाच अजित डोवाल यांचेही सोशल मीडियावरुन अभिनंदन करण्यात येत आहे. भारताने यापूर्वी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकमध्येही अजित डोवाल यांची महत्त्वाची भूमिका होती.

त्यानंतर आज बालाकोटमध्ये जवळपास ३.४५ वाजता, मुजफ्फराबादमध्ये ३.४८ वाजता, तर चाकोटीमध्ये ३.५८मध्ये प्रशिक्षण शिबिरांवर हल्ला केला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय हवाई दलाच्या मिराज २००० ची १२ लढाऊ विमाने घुसून बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील ‘जैश-ए-मोहम्मद’च्या दहशतवादी तळांवर हल्ले करत होती. मोदी त्यावेळी साऊथ ब्लॉकमध्ये होते आणि कंट्रोल रुममधून त्यांचे या संपूर्ण मोहिमेवर लक्ष होते.

या हल्ल्यासंदर्भातील बैठका आणि योजनेत मोदींचे खास आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असणारे अजित डोवाल हेही सहभागी असल्याचे समजत असल्यामुळेच या हल्ल्यानंतर भारतीय हवाई दल, भारतीय लष्कर, पतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनएसए अजित डोवाल यांचेही कौतुक केले जात आहे.

दरम्यान, भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईनंतर एनएसए अजित डोवाल यांनी भारतीय लष्कर प्रमुख बिपिन रावत आणि भारतीय वायू सेनेचे प्रमुख बीएस धनोआ यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच देशाच्या सीमा भागातील सुरक्षेसंदर्भात आढावाही घेतला आहे.