#SurgicalStrike2: सलमान खान म्हणतो, ‘भारतीय वायुसेना…जय हो ‘

टीम महाराष्ट्र देशा – सोमवारी मध्यरात्री हवाई दलाच्या १२ मिराज विमानांनी पाकव्याप्त कश्मीरात घुसुन जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर १००० किलोच्या बॉम्बने हवाई हल्ले केले. अवघ्या २१ मिनिटात हवाई दलाने जैशचे तळ नेस्तनाबूत केले आहेत.

अभिनेता सलमान खान याने भारतीय वायुसेनेला सलाम ठोकत त्यांचे अभिनंदन केले आहे.

याबबत ट्वीट करत सलमान म्हणाला की, मला भारतीय वायुसेनेचा आदर आहे…जय हो.

पुलवामा येथील सीआरपीएफ हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून पाकिस्तानवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत होती. यामध्ये आता भारताकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये फायटर जेट्सच्या माध्यमातून तब्बल एक हजार किलोचे बॉम्ब अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर बरसवण्यात आले आहेत. कारगिल युद्धानंतर प्रथमच फायटर जेटच्या माध्यमातून करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.