सुरेश रैना लवकरच दिसणार ‘बिग बॉस’मध्ये?

raina

नवी दिल्ली : भारताचा माजी फलंदाज सुरेश रैना हा सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. तसेच वैयक्तिक कारणांमुळे 2020 चा हंगाम चुकवलेला सुरेश रैना आयपीएल 2021 मध्ये त्याच्या सर्वोत्तम कामगिरीसह परतला. याच खेळाडूने आता बिग बॉसमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

सीएसकेचा डावखुरा फलंदाज सुरेश रैना आणि त्याची पत्नी प्रियांका सीएसकेच्या ‘सुपर कपल’ मालिकेच्या पहिल्या भागात दिसले. या विशेष संभाषणादरम्यान, जेव्हा या जोडप्याला विचारण्यात आले की तुम्हाला कोणत्या रिअॅलिटी शोमध्ये उपस्थित राहायला आवडेल, तेव्हा रैनाने  बिग बॉसच्या दक्षिण भारतीय आवृत्तीत सहभागी होण्याची इच्छा बोलून दाखवली. रैना म्हणाला, ‘मला दक्षिण भारतीय बिग बासमध्ये जायला आवडेल.

एंड्रयू साइमंड्स, एस श्रीसंत, सलिल अंकोला, विनोद कांबली, नवजोत सिंह सिद्धू आणि द ग्रेट खली हे दिग्गज खेळाडूही बिग बॉस या रिअॅलिटी शोचा भाग राहिले आहेत. आता लवकरच रैना देखील बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून दिसू शकतो. रैनाने आपली बिग बॉस रिअॅलिटी शोमध्ये जाण्याची इच्छा बोलून दाखवली असता, चाहते देखील त्याला आता बिग बॉसमध्ये पाहण्यास उत्सुक झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या