रविंद्र जडेजाच्या चुकीमुळे सुरेश रैना आऊट ; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

रविंद्र जडेजा

मुंबई : चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघाचा नुकताच वानखेडे स्टेडियमवर झाला. या सामन्यात ऋषभ पंतच्या संघाला म्हणजेच दिल्ली कॅपिटल्सला विजय मिळवण्यात यश आलं. शिखर धवन आणि पृथ्वी शॉच्या मदतीने दिल्ली कॅपिटलने आयपीएलच्या 14 व्या सत्रातील पहिल्या सामन्यात चेन्नईचा 7 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजीसाठी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकांत 7 गडी गमावल्यानंतर 188 धावांची सन्माननीय धावसंख्या उभारली. यानंतर धवन आणि पृथ्वीच्या फलंदाजीमुळे दिल्लीने हे लक्ष्य सहज 18.4 षटकांत गाठले. धवनने 85 धावा केल्या आणि पृथ्वीने 72 धावांची तुफानी खेळी केली.

त्याचवेळी चेन्नईकडून रैनाने सर्वाधिक 54 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) स्टार फलंदाज सुरेश रैनाचं आयपीएलमध्ये पुनरागमन धमाका होता. दिल्लीविरूद्धच्या   झालेल्या सामन्यात शानदार 54 धावा केल्या. त्याने मार्कस स्टोइनिसच्या चेंडूवर षटकारासह 32 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.

सुरेश रैना चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्याच वेळी धावा काढण्यासाठी रविंद्र जडेजा आणि रैना जात होते. एक रन झाला आणि दुसरा काढत असताना जडेजा गोलंदाजावर जोरात धडकला. त्यामुळे एक क्षण गोंधळ उडाला. याच संधीचा फायदा उचलून ऋषभ पंतनं रैनाला रन आऊट केलं.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी रविंद्र जडेजाला ट्रोल केलं आहे. जडेजाच्या एका चुकीचा चांगल्या फॉर्ममध्ये खेळणाऱ्या रैनाला फटका बसला आणि तो आऊट झाला.

महत्वाच्या बातम्या 

IMP