कुलदीपच्या यशामागे कुंबळेचे योगदान:रैना

कुलदीप यादवचं रैनाने केलं कौतुक

मुंबई : मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कुलदीप यादव खूप लक्षवेधी ठरत असून, त्याच्या या यशामागे भारताचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचे फार मोठे योगदान असल्यामुळे कुलदीपच्या यशाचे श्रेय कुंबळे यांना जाते, असे भारताचा स्टार क्रिकेटपटू सुरेश रैना याने सांगितले.मुंबईत गुरुवारी गोवा रिव्हर मॅरेथॉनची घोषणा रैनाच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी रैनाने आपले मत व्यक्त केले.

आपल्या फिरकीने भल्या भल्या फलंदाजांच्या मनात धडकी भरवणारा कुलदीप यादव सध्या खूपच चर्चेत आहे.ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असणाऱ्या मालिकेत आपल्या चमकदार कामगिरीने कुलदीपने आपलं टीम इंडिया मधील स्थान भक्कम केल आहे . कुलदीपच्या या कामगिरीचा गौरव करताना सुरेश रैनाने स्तुतिसुमने उधळली आहेत .
‘कुलदीप सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याची कामगिरी उंचावण्यासाठी अनिल भार्इंनी खूप मेहनत घेतली आहे. आयपीएलमध्येही मी त्याचा खेळ जवळून पाहिला असून, अनेकवेळा चर्चा केली आहे. तसेच, ब्रॅड हॉगसारखा अनुभवी गोलंदाज संघात असूनही त्याने आपली स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. यामागे कुंबळे यांचीच मेहनत असून, त्यांनीच कुलदीपला घडविले आहे. कुलदीपमुळे गोलंदाजीमध्ये खूप विविधता आली.’ असं मत रैनाने व्यक्त केले.

 

You might also like
Comments
Loading...