उदयनराजे कोणत्याही पक्षात असो आमचा पाठींबा कायम : सुरेश पाटील

पुणे : खासदार उदयनराजे भोसले यांनी कोणत्याही पक्षातून निवडणूक लढवल्यास आमचा त्यांना पाठिंबा असणार आहे. त्यांच्या प्रचारासाठी आम्ही रस्त्यावर देखील उतरणार आहोत, असे मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी पुण्यात स्पष्ट केले.मंगळवारी पुण्यात मराठा समाजाचे नेते सुरेश पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मराठा समाजाच्या नवीन पक्षाची स्थापना दिवाळीच्या पाडव्याला रायरेश्वर मंदिरात करणार असल्याची घोषणा पाटील यांनी केली आहे. राज्यात 40 टक्के मराठा समाज आहे. माञ कॉग्रेस आणि राष्ट्रवादीनं मराठा समाजाची फक्त फसवणूक केली, तर भाजप सरकारनं देखील तेच केलं. यामुळं समाज वैफल्यग्रस्त झाला असून, सर्वांनी मिळून पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं.

उदयनराजे यांच्या उमेदवारी वरून राज्यात चर्चा सुरू आहे. या विषयी विचारलेल्या प्रश्नांवर पाटील यांनी उदयनराजेंना आमचा पाठींबा कायम असल्याचे सांगितले.