मोठी बातमी : सुरेश कलमाडी यांची तब्ब्येत बिघडली,रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल

पुणे : पुण्याचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना आज दुपारी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

चक्कर येऊन पडल्याने कलमाडी यांना रुबी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येतंय.