सुरेश धस यांचा उमेदवारी अर्ज दाखल

बीड : बीड-उस्मानाबाद-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील भाजपा, शिवसेना व महायुतीचे उमेदवार सुरेश रामचंद्र धस यांनी आपला उमेदवारी अर्ज आज उस्मानाबाद येथे राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत दाखल केला.

पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या रूपाने भाजप आणि राष्ट्रवादी वादात अतिशय प्रतिष्ठेच्या ठरलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्यामुळे सुरेश धस यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले होते.

बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे यांची जादूची कांडी प्रसिद्ध होती. ही कांडी फिरताच काही मंडळी उघडपणे तर काही मंडळी आपापल्या पक्षात राहून भारतीय जनता पक्षाला मदत करत असत. तोच खाक्या आता पंकजाताई मुंडे यांनी सुरेश धस यांच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरविला आहे.

You might also like
Comments
Loading...