अण्णा कसं..? शिवसेना म्हणती तसं..!

सुरेश धस शिवसेनेत जाणार की भाजपात..?संभ्रम कायम

आष्टी : सध्या बीड जिल्ह्यात भाजपा हाऊसफुल आहे. त्यामुळे सुरेश धसांसह अनेक पुढारी भाजपा प्रवेशासाठी सध्या वेटिंगवर आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत आष्टी मतदार संघातील जनतेने ‘औंदा कसं अण्णा म्हंतील तसं’असा प्रचार करत मतदारानी धसांच्या पदरात पाच जागा टाकत पंचायत समिती ताब्यात दिली होती. अण्णानी जिल्हा परिषदचे पाच सदस्य भाजपला देऊन नसती आफत ओढवून घेतल्याची परिस्तिथी झाल्यानंतर कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना देखील सुरेश धस यांच्या संपर्कात असल्याच समजतंय त्यामुळे कार्यकर्तेही अण्णा कस..??शिवसेना म्हणती तस..!अशी साद घालताना पहायला मिळत आहे.

बीड जिल्ह्यात शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. परंतु जिल्ह्यात तत्कालीन नेते गोपीनाथ मुंडे यांनी बीड मतदारसंघात शिवसेना जास्ती वाढुच दिली नाही. आता मात्र गेवराई मतदारसंघात माजी राज्यमंत्री बदमराव पंडित शिवसेनेत दाखल झाल्यानंतर बीडच्या राजकारणात शिवसेनेला चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे धसांच्या बाबतीत काय होणार हे येत्या काही दिवसांमधे पाहणं महत्वाच असेल. परंतु या संदर्भात सुरेश धस किंवा शिवसेना यांच्या कडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.