ज्यांनी स्वतःच्या रक्ताबरोबर राजकीय व्यभिचार केला त्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये : धस

आष्टी – ज्यांनी स्वतःच्या रक्ताबरोबर राजकीय व्यभिचार केला त्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये, अशी जहरी टीका आमदार सुरेश धस यांनी केली आहे. जिल्हा बँकेचे 22 कोटी रुपये भरा आणि मगच पांढरे कपडे घालून जिल्ह्यात नाक उचलून कार्यक्रमांना हजेरी लावा असा सल्ला देखील धस यांनी मुंडे यांना दिला आहे.

बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी धनंजय मुंडेंच्या संपत्तीवर टाच

एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार धस यांनी मुंडे यांच्यावर चौफेर टीका केली आहे. जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असताना विरोधी पक्षनेते स्वतःच्या मतदारसंघात नट-नट्यांना आणून गणेशोत्सवात कहोना प्यार है करीत आहेत असा टोला लगावत, आमच्यावर आरोप करताना ते सिद्ध होतील असेच बोलावे अन्यथा त्यांची सर्व पाळेमुळे मला माहीत आहेत, असा इशारा आमदार धस यांनी दिला आहे.