चुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा : धस

-suresh-dhas-

बीड-दुष्काळी बीड जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगाम उद्ध्वस्त झाला असताना पुढचे 135 दिवस चारा पुरेल एवढा चारा उपलब्ध असल्याचा अहवाल अधिकाऱ्यानी मुख्यमंत्र्याना आजच्या आढावा बैठकीत दिला. यावेळी आमदार सुरेश धस चांगलेच संतापल्याच पहायला मिळालं. चुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कानाखाली जाळ काढा, असं म्हणत त्यांनी हा अहवाल चुकीचा असल्याचे सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

दुष्काळाची पाहणी आणि प्रशासकीय आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड मध्ये दाखल झाले आहेत. तेथे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना बीडमधील सद्य परिस्थिती आणि करण्यात आलेल्या उपाय योजना यांची माहिती दिली मात्र धस यांनी हा अहवाल चुकीचा असल्याचे  मुख्यमंत्र्यांना सांगितले.

दरम्यान,“बीड जिल्ह्यातील दुष्काळाचा आढावा आज घेतला आहे. बीड जिल्ह्याचा दुष्काळ हा भीषणच आणि तीव्र स्वरूपाचा असून दुष्काळ निवारण आणि उपाययोजनासाठी तातडीने कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो, हाताला काम असो, जनावरांचा चारा असो की अजून पाण्याच्या योजना असो. तातडीने मार्गी लावल्या जाणार आहेत. सात हजार कोटी रूपयाच्या मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला आहे. लवकरच केंद्राचे पथक येईल, तोपर्यंत राज्य सरकार मदतीचा ओघ सुरू ठेवेल” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये सांगितले.Loading…
Loading...