सुरेश धस झाले भाजपचे दुसरे प्रशांत परिचारक , बिहारी समाजाबद्दल केलं लाजिरवाणे विधान

टीम महाराष्ट्र देशा : भाजपचे आमदार सुरेश धस यांची एका जाहीर कार्यक्रमाप्रसंगी विरोधकांवर टीका करताना जीभ घसरली. दुसऱयाच्या घरात मुलं झाले तरी आपण पेढे वाटायचे, अशी टीका त्यांनी यावेळी विरोधकांवर केली. मात्र, अशा प्रकारेच वादग्रस्त वक्तव्य करताना त्यांनी बिहारी नागरिकांचा दाखला दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात रहाणाऱ्या बिहारी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

परळी येथे शनिवारी ५ कोटींच्या रस्ते कामाचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमप्रसंगी सुरेश धस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांची उपस्थिती होती. एकीकडे महिलांचा सन्मान करा, असा सातत्याने आग्रह पालकमंत्री पंकजा मुंडे करत असतात. मात्र, त्यांच्या उपस्थितीतच यांच्याच पक्षातील आमदाराने अशा प्रकारे वक्तव्य केल्याने नागरिकांमधून चर्चा रंगू लागली आहे. तर धस यांच्या या वक्तव्याचा सामान्य नागरीकांमधून निषेधही व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही भाजपचेच आमदार प्रशांत परिचारक यांनी अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य केले होते.