‘धनंजय मुंडेंचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा’

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी पक्षबांधणी, राजकीय दौरे, भेटीगाठी यांसारख्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहेत. या दरम्यान अनेक राजकीय नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत.

बीड जिल्ह्यातील भाजपचे नेते सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी आष्टी येथील कार्यक्रमात बोलताना ‘तोडपाणी करणारे धनंजय मुंडें शेतकऱ्यांचे पैसे का देत नाही? जगमित्र कारखाना काढतो म्हणून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडल्या, त्यांना खोटे चेक दिले, पैसे लाटले, याप्रकरणी शेतक-यांनी त्यांना कोर्टातही खेचले आहे. ते धनंजय मुंडें आरोप करतात त्यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत’ अशी टीका सुरेश धस यांनी केली आहे.

तसेच सुरेश धस यांनी पुढे बोलताना ‘पंकजा यांच्यावरील आरोप केवळ राजकीय द्वेषातून असतात, हे आता जनतेला माहीत झाले आहे, असे सांगून मयत शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडणारांना ‘वैद्यनाथ’वर बोलण्याचा अधिकार नाही, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा म्हणजे एक नाटक होते. हा मोर्चा मुळातच पालकमंत्री पंकजा मुंडे यांना विरोध करण्यासाठी होता, हे सिद्ध झाले आहे असंही धस म्हणाले.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी वैद्यनाथ कारखान्याला आपल्या काळजाप्रमाणे जपलं, आज त्यांचाच वारसदारांनी कारखान्याची दशा केली आहे. विश्वासाने मतांचे आंदण दिले त्याच शेतकऱ्यांना यांनी लुटले, असा आरोप पंकज मुंडे यांच्यावर केला होता त्याला धस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करा; मुख्यमंत्र्यांनी दिले प्रशासनाला आदेश

हि राजकीय कुरघोडीची वेळ नाही, सरकारकडून पूरग्रस्तांना योग्य मदत केली जाईल – मुख्यमंत्री

मोठी बातमी : सांगलीच्या महापुरात महादुर्घटना; बचावकार्याची बोट उलटून १० – १२ जणांचा मृत्यू