सध्या राष्ट्रवादी फक्त फेक अॅकाउंटवरच चालते – सुरेश धस

suresh dhas

बीड / प्रतिनिधी : सोशल मिडीयावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकत्यानी मोठ्या प्रमाणात फेक अॅकाउन्ट तयार केले आहेत हा सगळा पक्ष सध्या फेक अॅकाउन्टवरच चालतो असा ग॔भीर आरोप आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथे पञकार परिषदेत बोलताना केला आहे.

लातर-बीड उस्मानाबाद स्थानिक स्वराज संस्था निवडणूकीत विजयी झालेले सुरेश धस सध्या नागपुर येथे सुरू असलेल्या अधिवेशनाच्या सभागृहात बोलताना चांगलेच चमकत आहेत. बीड जिल्ह्याच्या आष्टी येथे आज निवास्थानी पञकार परिषद घेतली.

यावेळी बोलताना सुरेश धस म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे काही कार्यकर्ते अतिशय खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहेत, कधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस तर कधी ग्रामविकासमंञी पंकजा मुंडे तर कधी मनाला वाटेल त्या पोस्ट फेसबुवर टाकत अशा फेक अॅकाऊन्टचा शोध घेऊन राष्ट्रवादीच्या कार्यकत्यावर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करावेत अशी मागणी मी केली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सध्या फक्त फेक अॅकाऊन्टवरच चालतो पैसे देऊन स्वतःच कमेन्ट, लाईक वाढुन राष्ट्रवादी खुप मोठा पक्ष आहे असा देखावा केला जात आहे असेही धस यांनी सांगितले.