fbpx

सुरेश धस यांनी दुष्ट प्रवृत्तीच्या विचारावर विजय मिळवला- क्षीरसागर

kshirisagar

बीड : ‘सुरेश धस यांचा विजय म्हणजे दुष्ट प्रवृत्तीच्या विचारावर मिळवलेला विजय आहे.’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे भारतभूषण क्षीरसागर यांनी स्पष्ट केले. उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस यांचा ७६ मतांनी विजय झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते भारतभूषण क्षीरसागर गेल्या अनके वर्षभरापासून नाराज आहेत. क्षीरसागर यांनी धस यांचा सत्कार केल्यामुळे राजकीय चर्चेला उधान आलं आहे. सुरेश धस यांना पडलेली विक्रमी मतं कुठून आले ? याचं उत्तर आता स्पष्ट होत आहे. भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितल्याप्रमाणे ‘सुरेश धस यांचा विजय म्हणजे दुष्ट प्रवृत्तीच्या विचारावर आहे’ त्यामुळे त्यांची राष्ट्रवादीवर असलेली नाराजी उघड झाली आहे.

धनंजय मुंडे कितीही म्हणत असले की राष्ट्रवादी काँग्रेसचं एक ही मत फुटलेलं नाही. तर भारतभूषण आणि जयदत्त क्षीरसागर यांची मतं कोणाला पडली हे उघड सत्य सर्वांच्या समोर आले आहे.

उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत सुरेश धस यांना 527 मतं, अशोक जगदाळे यांना 451 मतं मिळाली. तर तब्बल 25 मतं बाद झाली.

1 Comment

Click here to post a comment