धनंजय मुंडेंना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे – सुरेश धस

टीम महाराष्ट्र देशा : संविधानिक पदावर असलेले विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी न्यायालयाचा आदेशाचा मान ठेऊन विरोधीपक्ष नेते पदाचा राजीनामा द्यावा. धनंजय मुंडे यांचा खोटं बोल पण रेटून बोल हा खरा चेहरा समोर आलेला आहे अशी टीका करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे.

दरम्यान, राज्यभर गाजलेल्या बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाने विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना दणका दिला आहे. परळीतील संत जगमित्र सूतगिरणीच्या तीन कोटींच्या कर्ज वसुलीसाठी धनंजय मुंडे यांच्यासह इतर आठ जणांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. यापुढे या मालमत्तेची विक्री अथवा व्यवहार करता येणार नाही. तरीही धनंजय मुंडे खोटे बोलून या प्रकरणाला राजकीय वळन देऊन आपल्या बचावाचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे सुरेश धस म्हणाले आहेत.

धनगर समाजाला आरक्षण देणार की नाही हे स्पष्ट सांगावे : धनजंय मुंडे

तसेच, “महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्यानुसार औरंगाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणी विशेष तपास यंत्रणा (एस.आय.टी.) स्थापन करण्यात आलेली असून त्यावर अतिरिक्त पोलीस महासंचालक यांचे नियंत्रण आहे त्यामुळे बीड पोलीस अधीक्षकांचा काहीही संबंध नसताना विनाकारण त्यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप करीत आहेत. या सुतगिरणी आणि संचालकांची व्यक्तिगत मालमत्तेवर टाच असल्याचे सांगून सध्याचे आठ संचालक सध्या जात्यात असून बाकीचे सुपात आहेत.  त्यांच्यावरही यथावकाश कारवाई होणार आहे. तरी उठसुठ राज्यशासनावर आणि इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे धनंजय मुंडे तोंडघशी पडले असून जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे” असे धस यांनी सांगितले. या प्रकरणी त्यांनी

मराठा समाजाच्या संयमाचा अंत पाहू नका : धनंजय मुंडे

You might also like
Comments
Loading...