“आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पहावं वाकून. ही अजित पवारांची सवय” – सुरेश धस

बीड : आष्टीमध्ये झालेल्या सभेत अजित पवार यांनी सुरेश धसांवर वैयक्तिक पातळीवर टीका केल्याने सुरेश धस यांचा तिळपापड झाला आहे. अजित पवारांच्या टीकेला उत्तर देताना सुरेश धस म्हणाले, “आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पहावं वाकून. किमान अजितदादांनी तरी अशी वाक्य वापरु नयेत. त्यांच्याबद्दल मलाही बरंच काही बोलता येईल. परंतु, अजूनही मी बोललेलो नाही. कदाचित, उद्या-परवापासून बोलायला सुरुवात करेन.” असा गर्भित इशारा सुरेश धस यांनी दिला आहे.

दरम्यान, आष्टीमध्ये बाळासाहेब आजबे यांच्या प्रवेश सभेवेळी अजित पवार यांनी सुरेश धस यांच्या टिका करताना, “एखाद्याला संधी दिल्यानंतर त्या संधीचं सोनं करायचं की त्याची राख करायची, हे ज्याच्या-त्याच्या हातामध्ये असतं. जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी काम करतोय, तोपर्यंत या गद्दारांना राष्ट्रवादीत प्रवेश नाही. काय काय माणसं वेळ पडली तर पाय धरतात, डोळ्यात पाणी आणतात. ज्यांनी स्वत:च्या पहिलीला सोडलं नाही, ते इतरांना काय सोडणार? तुमच्या मनात जे आहे, ते माझ्या मनात आहे.” अस वक्तव्य केल होत.Loading…
Loading...